Breaking News

फलटण येथे व्यापाऱ्याच्या गाडीची काच फोडून ५ लाख ३० हजार लंपास

5 lakh 30 thousand were stolen by breaking the glass of a trader's car at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि.३ मार्च-  शहरात विविध हार्डवेअर दुकानांना पुरवलेल्या मालाचे पेमेंट गोळा करत असणाऱ्या व्यापाराच्या चारचाकी गाडीची काच फोडून, आतमध्ये ठेवलेली  ५ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम काळ्या बॅगसह  अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

    याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी भवानीपेठ पूणे येथून अर्मितलाल वर्दीचंद ओसवाल हे फलटण शहरातील हार्डवेअर विक्री करण्याऱ्या दुकानदारांना पुरवलेल्या मालाचे पेमेंट गोळा करण्यासाठी ग्रे रंगाची टोयोटा अल्टीस वाहन क्र एम एच ११ बी एच ६५०० यामधून फलटण येथे आले. दिवसभर पेमेंट गोळा करून, दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एस आर जागीड अँण्ड ग्लास जिंतीनाका फलटण  या दुकानासमोर, गाडी लावून, ओसवाल दुकानात गेले असता,   कारची ड्रायव्हर शेजारील बाजूची काच फोडून सीटवरील ५ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम  ठेवलेली काऴ्या रंगाची हँण्ड बँग कोणीतरी अज्ञात चोरट्याने  चोरून नेली असल्याची फिर्याद अर्मितलाल वर्दीचंद ओसवाल यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

No comments