Breaking News

फलटण तालुक्यातील ४ सुकन्यांची सातासमुद्रापार यशस्वी गरुडभरारी

4 girls from Phaltan taluka have been successful abroad

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ मार्च -   : फलटण तालुक्यात आरडगाव या छोट्या, परंतू ऐतिहासिक, राजकीय, वैचारिक दृष्ट्या अत्यंत मोठी उंची गाठलेल्या, गावाशी नाळ जोडलेल्या भोईटे कुटुंबातील ४ सुकन्या सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवीत केवळ आरडगाव नव्हे सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यात यशस्वी झाल्या आहेत. 

 जागतिक महिला दिनाच्या (World Women's Day) पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील आरडगावच्या या ४ सुकन्यांच्या कर्तृत्वाची छोटी झलक.........

कु. अपूर्वा बाळासाहेब भोईटे

    कु. अपूर्वा बाळासाहेब भोईटे हिचे आई - वडील दोघेही माध्यमिक शिक्षक आहेत. अपूर्वाने २०१३ साली Computer Science ही पदवी संपादन केली,  Accenture  या कंपनी मध्ये २.५ वर्षे नोकरी करुन २०१६ साली अमेरिकेला गेली आणि  University of Cincinnati मधून Masters in Buisness Analytics  ही पदवी मिळवून  Expedia या नामांकित कंपनी मध्ये Data scientist  या पदावर कार्यरत आहे. ती लहानपणापासूनच हरहुन्नरी व चतुरस्त्र असून अमेरिकेत स्वतःची वेगळी ओळख तीने निर्माण केली आहे.

कु. शिवानी नरेंद्र भोईटे

 कु. शिवानी नरेंद्र भोईटे ही सुद्धा एका माध्यमिक शिक्षिकेची व अर्थ क्षेत्रातील व्यावसाईक पित्याची सुकन्या आणि माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांची नात आहे. कु. शिवानीने २०१७ साली  Computer Science ची पदवी मिळवून २ वर्ष पुण्यात नोकरीचा अनुभव घेतला आणि २०१९ साली अमेरिकेला गेली. Georgia State University येथून Masters in Computer Science ही पदवी मिळविली. अमेरिकेत शिकताना तिने शिष्यवृत्ती तर मिळवलीच पण त्याचबरोबर Research Assitant  म्हणून कामही केले. कमवा आणि शिका यांचे उत्तम उदाहरण. आता शिवानी Amazon या जगप्रसिद्ध कंपनी मध्ये Machine Learning Engineer आहे. 

कु. मनोज्ञा जयदीप भोईटे

     कु. मनोज्ञा जयदीप भोईटे ही भारती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डाॅ. उत्तमराव भोईटे यांची नात आहे. तीची आई पण प्रोफेसर आहे. University of Southern California मधून  Masters of Computer Science ही पदवी मिळवून ती Amazon या जगप्रसिद्ध कंपनी मध्ये काम करते.

कु. अमृता बाळासाहेब भोईटे

    कु. अमृता बाळासाहेब भोईटे    सध्या  Accounting and Analytics या विषयामध्ये University of Seattle येथे Masters in Accounting and Analytics करत आहे.

 विशेष म्हणजे अमेरिकेमध्ये  वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या शहरात शिक्षण घेऊन नोकरीच्या  निमित्ताने त्या Seattle या  Wasington राज्याच्या शहरात आहेत. आपल्या देशाचे संस्कार जपत आपल्या मातीशी नाळ जोडलेल्या या सुकन्यां निश्चितच आरडगांव साठी अभिमानाची बाब आहे.

          जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा दिल्या असून उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा आणि ती पूर्ण  करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करा, यश आपलेच आहे. आयुष्यात आई - वडील, मायभूमी आणि स्वावलंबन अतुल्य आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.

No comments