Breaking News

युक्रेन मध्ये अडकलेला फलटणचा विद्यार्थी परत ; पंतप्रधान मोदी व खा. रणजितसिंह यांचे मानले आभार

Student stranded in Ukraine returns to Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ मार्च -  फलटणचा अतुल प्रकाश नायर हा विद्यार्थी युक्रेनमध्ये युद्ध परिस्थिती मध्ये अडकला होता, तो मायदेशी सुखरूप पोहोचला. तो परत फलटणला आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने, घरी जाऊन त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनूप शहा,  माजी नगरसेवक अशोकराव जाधव, युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सुशांत निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक राजेश शिंदे व समस्त नायर परिवार उपस्थित होते. 

 अतुल नायर यांनी युक्रेन मधील संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली, जगातील इतर देशांनी आपापल्या देशातील मुलांना कसलीही मदत केली नाही, परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सातत्याने लक्ष घालून आपल्या देशातील मुलांना आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत संगितले.

    देशातील राजदूत खूप मेहनत घेत आहेत, प्रत्येक भारतीयावर लक्ष ठेवून अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे अतुल नायर यांचे वडील प्रकाश नायर यांनी सांगितले.  मुलगा सुखरुप घरी आला, त्याबद्दल प्रकाश नायर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले.  

No comments