Breaking News

श्रीमंत मालोजीराजे बँकेच्या चेअरमनपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. योगीनी पोकळे

नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देताना सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण सुनिल धायगुडे शेजारी नवनिर्वाचित संचालक मंडळ व अन्य मान्यवर. (छाया : योगायोग फोटो, फलटण.)
Shrimant Sanjeevraje Naik Nimbalkar will be the Chairman of Shrimant Maloji Raje Bank

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि., फलटणच्या चेअरमनपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आणि व्हा. चेअरमनपदी सौ. योगीनी योगेश पोकळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

        संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून त्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिलीच बैठक आज (दि. १४) सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), फलटण सुनिल धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या येथील मुख्य कार्यालयात संपन्न झाली, त्यामध्ये वरीलप्रमाणे चेअरमन/व्हा. चेअरमन निवड बिनविरोध पार पडली.

        चेअरमन/व्हा. चेअरमन निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन सौ. योगीनी पोकळे व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बुलढाणा अर्बन बँकेचे चेअरमन राधेश्यामजी चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

      बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम असून बँकेकडे २५३ कोटी रुपयांच्या ठेवी, १४२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून मार्च २०२२ अखेर बँकेला ७५ लाख रुपये नफा अपेक्षीत असल्याचे सांगून बँकेच्या सर्व १४ शाखांच्या माध्यमातून सभासद, ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

   नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सौ. योगीनी योगेश पोकळे, मोहनराव विठ्ठलराव नाईक निंबाळकर, चंद्रकांत यशवंतराव रणवरे, सुव्रत शिरीष देशपांडे, विकास पुखराज भटेवरा, सुहास शंकराप्पा जतकर, मोहनराव संपतराव खलाटे, सुभाष विठ्ठलराव गायकवाड, स्वीदिन रमणलाल गांधी, सौ. निवेदिता उमेश नाईक निंबाळकर, सौ. शिल्पा चंद्रशेखर कुलकर्णी, अॅड. विजय भिकोबा नेवसे, भानुदास पांडुरंग सरक, प्रा. डॉ. प्रभाकर रामचंद्र पवार यांचा समावेश आहे.

       बँकेची सांपत्तिक स्थिती उत्तम असून बँकेकडे २५३ कोटी रुपयांच्या ठेवी, १४२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून मार्च २०२२ अखेर बँकेला ७५ लाख रुपये नफा अपेक्षीत असल्याचे सांगून बँकेच्या सर्व १४ शाखांच्या माध्यमातून सभासद, ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

No comments