Breaking News

फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे मंत्री सकारात्मक ; खा. रणजितसिंह यांनी घेतली शिष्टमंडळासह भेट

Railway Minister positive about starting Phaltan Pandharpur Railway 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील फलटण  तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शिष्टमंडळाने  रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंढरपूर येथे रेल्वे  सुरू करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण बाबी  त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या,   इंग्रजांच्या काळात पंढरपूर  रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण होऊन रेल्वेसाठी जमीन संपादित झालेली आहे, परंतु त्यानंतर कोणतेही काम होऊ शकले नाही, पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे देवस्थान पंढरपूर आहे,  येथे दरवर्षी पाच ते दहा लाख लोक पायी  वारकरी चालत येत असतात. दर महिन्याला कमीत कमी एक लाख लोक पंढरपूर येथे देवदर्शन घेण्यासाठी  येत  असतात. त्यामुळे गोरगरीब जनतेसाठी रेल्वे हा मार्ग अत्यंत सोयीचा व कमी खर्चाचा असतो, त्यामुळे हा मार्ग सुरू करण्याबाबत आपण आदेश द्यावे अशी मागणी शिष्टमंडळाने केली. 

     रेल्वेमंत्री अश्र्विन वैष्णव यांनी याबाबत तातडीने संबंधित विभागास  फाईल मागून घेऊन, त्यावर सकारात्मक मार्ग काढण्यात येईल असे शिष्टमंडळास आश्वासन दिले.  यावेळी युवा नेते धनंजय साळुंखे-पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक सचिन अहिवळे, माजी नगरसेवक जाकिरभाई मणेर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, बाळासाहेब कदम,  धनंजय पवार, सुनील जाधव, राजेंद्र निंबाळकर, राजेंद्र नागटिळे, रियाज इनामदार, किरण राऊत,  यशवंत जाधव, संजय गायकवाड, आदर्श खटके, राजेश शिंदे, हणमंत जगताप उपस्थित होते.

No comments