Breaking News

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत दिव्यांग लाभार्थ्यांची निवड

Selection of disabled beneficiaries in the presence of Guardian Minister Balasaheb Patil

     सातारा, दि. 17  (जिमाका) :  जिल्हा परिषदेच्या सेसमधून 5 टक्के स्वनिधीतून दिव्यांगांना वैयक्तिक लाभाच्या योजनाचा लाभ देण्यात येतो. या  लाभार्थ्यांची निवड पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात लाभार्थ्यांच्या नावांच्या चिट्या काढून  नावे अंतिम करण्यात आली.

  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांच्यास दिव्यांग उपस्थित होते.

       सन 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या 5 टक्के स्वनिधीतून दिव्यांग कल्याण कार्यक्रमांतर्गत 115.88 लक्ष इतकी  अंदाजपत्रकीय तरतुद करण्यात आली आहे. यामधून घरकुल, घरघंटी, 3 चाकी स्वयंचलित स्कूटर, झेरॉक्स मशीन, खेळाडूंना अर्थसहाय्य देणे, निर्वाह भत्ता, लॅपटॉप, दिव्यांग-दिव्यांग विवाहास प्रोत्साहनपर अनुदान या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. या लाभार्थ्यांची निवड आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थित चिट्टया काढून करण्यात आली.

No comments