Breaking News

फलटणच्या श्रीराम मंदिर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश ; रामवसा घेण्यास स्त्रियांना प्रतिबंध

Prohibition order in Shriram temple area of Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ जानेवारी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील श्रीराम मंदिर परिसरात दिनांक १४ जानेवारी २०२२ रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून, मकर संक्रांतीनिमित्त श्रीराम मंदिर येथे वानवसा घेण्यासाठी  येणाऱ्या स्त्रियांनाही प्रतिबंध करण्याचे आदेश  फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.

     कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सातारा जिल्हयासाठी  दिनांक १०/०१/२०२२ रोजीचे ०.०० पासून पुढील आदेश होईपर्यंत विविध निर्बंध घोषित करण्यात आलेले आहेत. मकर संक्राती निमीत्त श्रीराम मंदिर या ठिकाणी फलटण तालुक्यातील तसेच आजुबाजूचे तालुक्यातील तालुक्यातील महिला मोठया प्रमाणात रामवसा घेणेसाठी येत असतात, श्रीराम मंदिर फलटण सकाळी ०६.०० वाजलेपासून ते रात्री ८.০० वाजेपर्यंत अंदाजे २० ते २५ हजार महिला रामवसा घेणेसाठी येत असतात.  सदर उत्सव साजरा करताना  गर्दी झालेस कोरोना विषाणुचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने  मकर संक्राती निमीत्त दिनांक १४/०१/२०२२ रोजी सकाळी ०६.०० वाजलेपासून ते रात्री ८.०० वाजेपर्यंत श्रीराम मंदिर फलटण येथील परिसरामध्ये यादवारे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत. मंदिर व्यवस्थापनाने मकर संक्रातीदिवशी रामवसा घेण्यासाठी कोणीही महिला उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच फलटण शहरातील इतर मंदिरे व ग्रामीण भागातील मंदिर परिसरामध्ये जमावाने गर्दी करणेस प्रतिबंध करीत आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. जिल्हादंडाधिकारी सातारा तसेच पोलीस विभागाकडील सूचना व आदेश यांचे पालन करणे सर्वांवर बंधनकारक राहील असे  आदेश फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.

No comments