Breaking News

फलटण येथे मुलीची छेड काढण्याच्या कारणावरुन युवकाचा मर्डर तर दुसऱ्याचा हाफ मर्डर

Murder of a youth by beating with a sword and half murder of another

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ जानेवारी - आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो ? असा जाब विचारात  सहाजणांनी पवार गल्ली, फलटण येथील निलेश चव्हाण व भरत फडतरे यांना तलवार, लोखंडी पाइप व  लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले, यामध्ये निलेश चव्हाण मयत झाला असून, ६ जणांच्या विरोधात खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12/1/2022 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास फलटण येथे श्रीराम मंदीराजवळ, श्रीराम पोलीस चौकीसमोर,  निलेश हिरालाल चव्हाण व त्याचा मित्र भरत फडतरे यांना,  आमच्या गल्लीतील मुलींची छेड का काढतो?  असे म्हणुन सलिम शेख रा. कुंभारटेक, फलटण याने लोखंडी तलवारीने, सैफुला सलिम शेख रा. कुंभारटेक, फलटण व जमिर सलिम शेख रा. कुंभारटेक, फलटण यांनी लोखंडी पाईपने तर बिलाल व राज बागवान आणि एक अनोळखी इसम यांनी लाकडी दांडक्याने व इतर अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने मारहाण करुन, जीवे मारण्याची धमकी देवुन, गंभीर जखमी केले. या मारहाणीत  निलेश चव्हाण हा मयत झाला आहे. तसेच भरत फडतरे यास  गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद सौ. कांता हिरालाल चव्हाण यांनी दिली आहे.

    गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक भारत केंद्रे हे करीत आहेत.

No comments