Breaking News

बेरोजगारांसाठी 12 व 13 जानेवारी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organizing online job fair for unemployed on 12th and 13th January

    सातारा  (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांच्यामार्फत 12 व 13 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून  याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून करण्यात  आले आहे.

या मेळाव्यात लिपिक, टॅली, ऑपरेटर, कॅशिअर, अकौंटंट, प्रोग्रामर, वेब डिझायनर, शिक्षक, ॲडमिस्ट्रेटर, मार्केटिंग ऑफिसर, लॅबइनजार्च अशा प्रकारची एकूण 334 रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन  अधिसुचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पुर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे, जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल.  मेळाव्यात सहभागी  झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स  अथवा टेलीफोन याद्वारे ऑनलाईन  घेण्यात येणार आहेत.

तसेच नोकरी  इच्छुक  उमेदवारांनी देखील  ऑनलाईन  रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी महास्वयंम https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टवर उपलब्ध रिक्त पदांना ऑनलाईन अर्ज करावे.  उद्योजकांकडून उमेदवारांच्या मुलाखती टेलीफोन अथवा व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे नियोजित  करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे प्रत्यक्ष अथवा 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच  satararojgar1@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

No comments