सरडे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
श्रीमंत संजीवराजे बोलताना शेजारी दत्ता भोसले, सुखदेव बेलदार व अन्य मान्यवर. |
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सरडे येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - सरडे, ता. फलटण येथे गेल्या पंचवार्षिकला वेगळ्या विचारांची ग्रामपंचायत होती, आता लोकांनी चूक दुरुस्त केल्याने ही पंचवार्षीक विचारांची व विकास कामाची आहे, सरडे ग्रांमपंचायत माध्यमातून विविध विकास कामाचा शुंभारभ तसेच अनेक चांगल्या प्रकारे कामे होत आहेत आगामी काळात ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सरडे ग्रामपंचायत च्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते .
सरडे ग्रामपंचायतीने जबाबदारीने कामे केली पाहिजेत, ग्रामपंचायत एकी तुटू देऊ नका. आपण आपला पराभव करु शकतो, आपला पराभव करण्याएवढी ताकद विरोधकांमध्ये नाही त्यामुळे नवीन जुने असे न करता एकीने काम करा तुम्हाला मागेल ते काम आणि त्यासाठी पुरेसा निधी देण्याची ग्वाही देत विकास कामाचा गाडा असाच ग्रामपंचायतीने पुढे नेला पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
गेल्या ८/१० वर्षापासून प्रलंबीत नीरा - वागज रस्त्याचा प्रश्न आहे त्या रस्त्या संदर्भातील प्रश्न मार्गी लावले पाहिजेत यामध्ये विद्यार्थी तसेच बारामती एमआयडीसी मध्ये काम करणारे कामगार यांना निरा - वागज रस्त्याने जावे लागते, गावातील सर्वच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे यांनी व्यक्त केले.
माजी सरपंच दत्ता भोसले यांनी गावाचा सर्वांगीण विकास अतिशय चांगल्या दर्जाचा व भ्रष्टाचार मुक्त करण्याची ग्वाही देत गावातील सर्व ठिकाणचे रस्ते, पाणी, आरोग्य या कडे प्रामुख्याने लक्ष देऊन नागरीकांना कोणत्याही अडचणी ग्रामंपंचायत माध्यमातून येऊ देणार नाही याची खात्री दिली. श्रींमत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दत्ता भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन दत्ता भोसले यांचे कौतुक केले. दत्ता भोसले यांच्या सारखे तरुण गावात घडले पाहीजेत व गावचा विकास चांगल्या प्रकारे झाला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सरडे गावच्या सरपंच पुनम चव्हाण, उपसरपंच महादेव विरकर, सुखदेव बेलदार, कांतीलाल बेलदार, विशाल मोरे, राजूभाई शेख, सोमनाथ करडे, महादेव चव्हाण हरिबा करडे, काळूराम चव्हाण, सचिन बेलदार यांच्यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments