हणमंत बापूराव चव्हाण यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मलठण येथील हणमंत बापूराव चव्हाण यांचे दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
हणमंत बापूराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद अंतर्गत फलटण पंचायत समिती, लघु पाटबंधारे, कृषी खाते दहिवडी येथे सेवा बजावली होती. हणमंत चव्हाण यांचा स्वभाव शांत व मनमिळावू होता.
हणमंत बापूराव चव्हाण यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता दत्तघट, फलटण येथे करण्यात येणार आहे.
No comments