Breaking News

बुधवार पेठ फलटण येथे घरफोडी ; ३ लाख ११ हजारांचे साहित्य चोरीस

Burglary at Phaltan; Items worth Rs. 3 lakh 11 thousand were stolen

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ जानेवारी - सेवानिवृत्त नगर अभियंता जीवन केंजळे यांच्या बुधवार पेठ फलटण येथील बंद घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश करून,  घरातील ३ लाख ११ हजार रुपये किमतीची, जुनी वडिलोपार्जित तांबे, पितळी व स्टीलची भांडी व इतर घरउपयोगी साहित्याची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.

    माहे ऑक्टोंबर २०२१ ते दिनांक २ जानेवारी २०२२ रोजीचे दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान बुधवार पेठ फलटण येथील, सेवानिवृत्त नगर अभियंता जीवन केंजळे यांच्या जुन्या बंद घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने, कशाच्या तरी सहाय्याने तोडून, पाठीमागील पश्चिम बाजूचे व उत्तर बाजूचे दरवाजे उघडून आत प्रवेश करून, घरातील जुनी वडिलोपार्जित तांबे, पितळी व स्टील ची भांडी व इतर घरउपयोगी साहित्य त्याच्यावर गणपत राजाराम केंजळे, लक्ष्मीबाई गणपत केंजळे, सदाशिव गणपत केंजळे, कमल सदाशिव केंजळे अशी नावे कोरलेली होती.

    यामध्ये 60 किलो वजनाचा पितळी पिंप, पितळेची मोठी 5 भांडी, 2 पितळेच्या पराती, 1 पितळेचे उलतान, 12 पितळी डबे, 20 पितळी हांडे, 2 पितळी तरसाळे,  50 किलो वजनाचे 10 तांब्याचे हांडे,  40 स्टीलची ताटे, 30 स्टीलचे तांबे,3 स्टीलचे पिंप, 2 स्टीलच्या बादल्या, 2 स्टीलच्या पराती, 2 स्टीलचे तरसाळे, स्टीलचे चमचे, वाट्या, ताटल्या,  3 जर्मलची पातेली, 2 गँसच्या शेगड्या, 1 व्हिडीओकन कंपनीचा टी.व्ही., 1 व्हिडीओकन कंपनीचा फ्रीज, 1 दिल्ली मोड कंपनीचा कुलर, 1 लोखंडी कपाट,  पितळी शेवगा, स्टील शेवगा, 2 मिक्सर, कपडे, साड्या, बॅगा, टाळ, पखवाज, विणा असा एकूण  ३ लाख ११ हजार ७०० रुपये किमतीच्या साहित्याची अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केली असल्याची फिर्याद जीवन सदाशिव केंजळे यांनी दिली आहे. 

No comments