Breaking News

फलटण येथे प्रजासत्ताक दिनी सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न

satyashodhak wedding held at Phaltan on Republic Day

    गोखळी ( राजेंद्र भागवत) -  राष्ट्रपिता ज्योतिबा फुले स्थापित सत्यशोधक विवाह पद्धती काल्पनिक मनुवादी व्यवस्थेने निर्माण केलेल्या अनिष्ट रूढी परंपरेला पुर्ण फाटा देऊन बहुजन समाजातील महापुरुषांचे निसर्ग निर्मिकांच्या कार्याची व राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचें गुरू क्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचाराने प्रभावित होऊन, मातंग समाजातील वधुपिता धनंजय कांबळे रा.ढाकनी ता. दहिवडी यांची कन्या अश्विनी  व वरपिता शामराव खवळे रा.शिंदी खुर्द.ता दहिवडी यांचे चिरंजीव विशाल  या दांपत्यांनी आपल्या मुलामुलींचे विवाह संंत्यशोधक पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला व दि. 26/1/2022 प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून वधू सत्यशोधीका 'अश्विनी' व सत्यशोधक वर' विशाल' यांचा सत्यशोधक पध्दतीने विवाह संपन्न झाला. 

    महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन रामचंद्र भागवत(पाटस) व डॉ दत्तात्रय  जगताप( गोपाळवाडी ता.दौड) यांनी केले.  सभामंडपात वधू-वरांना भारतीय संविधान भेट देण्यात आले. धान्यांची नासाडी होऊ नये म्हणून सुगंधी फुलांची अक्षदा म्हणून वापर करण्यात आला.प्रारभी छ.शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वस्ताद लहूजी साळवे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर उमाजी नाईक, सावित्री ,जिजाऊ, अहिल्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विवाह समारंभ कोळकी ग्रामपंचायतीचे फुले शाहू आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी (फलटण) येथे संपन्न झाला.यावेळी माण, फलटण, दौंड, बारामती, मुंबई येथून मान्यवर उपस्थित होते.

No comments