Breaking News

विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई; ११ हजार रुपये दंड वसूल

Action taken against the citizens wandering around without a mask

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ जानेवारी २०२२ -  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने फलटण नगर परिषदेकडून शहरात काल ६ जानेवारी रोजी बाजारपेठेत व मुख्य चौकामध्ये विनामस्क फिरणाऱ्या ५५ नागरिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ११ हजार रुपये दंड वसूल केला.


     फलटण नगर परिषदेच्या पथकाने ज्या नागरिकांनी मास्क घातले नाही, त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्याकडून दंड वसूल करून, व मास्क घालणे बंधनकारक असल्याची समज नागरिकांना दिली. 

     फलटण शहर पोलिसांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे, ज्या नागरिकांनी मास्क घातले नाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला.

No comments