Breaking News

शहाबादी फरशी मारून वडिलांचा खुन केल्या प्रकरणी मुलास जन्मठेप

Accused sentenced to life imprisonment for murdering father

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० डिसेंबर -  साठेफाटा ता. फलटण येथे स्टोव्ह मागण्याच्या कारणावरून, झालेल्या भांडणात, मुलाने वडिलांचा शहाबादी फरशी मारून खून केला होता. सातारा सत्र न्यायालयाने या प्रकरणी मुलास दोषी धरून, त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

    फलटण येथील आरोपी नामे शामसुंदर नारायण इंगळे वय ४६ रा. साठेफाटा ता. फलटण जि. सातारा याने त्याचे वडिल नारायण भिकु इंगळे यांना स्टोव्ह मागीतला असता, त्यांनी देणेस नकार दिल्याने, चिडून जाऊन आरोपीने शिवीगाळ दमदाटी करुन, आता तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणुन, शहाबादी फरशीच्या तुकडयाने डोक्यात जबर मारहाण करुन खुन केला. म्हणुन वगेरे बाबत फिर्यादी विजय रामचंद्र इंगळे साठेफाटा ता. फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सदर गुन्हयाचा तपास श्री. आर. आर. भोळ तत्कालीन पोलीस उप निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी करून, आरोपी विरूध्द  न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. नमुद खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती मंगला धोटे सातारा यांचे कोर्टात झाली. सदर खटल्यामध्ये सुनावणी दरम्यान एकूण ०६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी निर्भीडपणे दिलेली साक्ष परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस खुनाबद्दल दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

    सदर केस कामी श्री. मिलींद ओक अति. जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयास सादर केलेले  सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे व भरघोस सबळ पुरावा न्यायालयात सादर करून योग्य तो युक्तीवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तीवाद मान्य करुन न्यायालयाने यातील आरोपीस आज दि.१०/०१/२०२२ रोजी भा.द.वि.स.क ३०२ अन्वये जन्मठेप व रु.५,०००/- दंड, दंड न दिलेस ०६ महीने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

    याकामी श्री. तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण व श्री. धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे तसेच मुस्ताक शेख पो.कॉ.७४ फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी योग्य ती मदत केली. त्यांना पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे श्री. राजेंद्र यादव (पोलीस उपनिरीक्षक) तसेच पोलीस अंमलदार श्रीमती उर्मिला घारगे (महिला सहा.पो.उप.नि.), शमशुददीन शेख (पो. हवा. १०५०), सुधीर खुडे (पो.हवा. २८५), गजानन फरांदे (पो.हवा. १६८४), रिहाना शेख ( महिला पो.ना. १६४४), राजेंद्र कुंभार ( पो.कॉ. २३९६), अश्विनी घोरपडे (महिला पो.कॉ. १७९८), अमित भरते (पो.कॉ.३८६) यांनी योग्य ती मदत केली आहे.

No comments