Breaking News

फलटण तालुक्यात 69 कोरोना पॉझिटीव्ह ; शहर 20, कोळकी 6, जाधववाडी 5

69 corona positive in Phaltan taluka; City 20, Kolaki 6, Jadhavwadi 5

     फलटण दि. 14 जानेवारी  2022  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  दि. 13 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 69 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 20 रुग्ण तर ग्रामीण भागात 49  रुग्ण सापडले आहेत. 

     दि. 13 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 69 बाधित आहेत. 69 बाधित चाचण्यांमध्ये 23 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर 46 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 20 तर ग्रामीण भागात 49 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 6,  जाधववाडी 5,  ठाकूरकी 1,  कापडगाव 1, कोरेगाव 1,  हिंगणगाव 1, शिंदे नगर 1, तिरकवाडी 1,  होळ 1, पाडेगाव 1, रावडी बुद्रुक 1, साठे 1,  सुरवडी 2, चव्हाणवाडी 2, नांदल 2, बोडकेवाडी 1, कापशी 1, मुळीकवाडी 1, विडणी 2, जिंती 1, गिरवी 1, भाडळी 1,  भाडळी खुर्द 1, राजाळे 2,  साखरवाडी 3, सांगवी 1, सोनवडी 1, वाठार निंबाळकर 1, गोखळी 2, इस्लामपूर तालुका माळशिरस 1,  माळेगाव तालुका बारामती 1, लोणंद तालुका खंडाळा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments