फलटण तालुक्यात 30 कोरोना पॉझिटीव्ह ; शहर 4, ग्रामीण 26
फलटण दि. 11 जानेवारी 2022 (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 10 जानेवारी 2022 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 30 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 4 रुग्ण तर ग्रामीण भागात 26 रुग्ण सापडले आहेत.
दि. 10 जानेवारी 2022 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 30 बाधित आहेत. 30 बाधित चाचण्यांमध्ये 6 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर 24 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 26 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 2, विडणी 2 , निंभोरे 1, गिरवी 2, पाडेगाव 1, पवारवाडी 2, फडतरवाडी 1, रावडी बुद्रुक 1, साखरवाडी 2, सस्तेवाडी 1, सुरवडी 2, चौधरवाडी 1, चव्हाणवाडी 1, तरडगाव 1, नाईकबोमवाडी 1, आसू 1, राजाळे 1, जाधववाडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments