Breaking News

सुपर गर्ल स्वरा भागवत च्या सायकलिंगची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियाने घेतली नोंद

World Records India records Super Girl Swara Bhagwat's cycling

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) - कु. स्वरा योगेश भागवत  रा. गोखळी ता. फलटण जि.सातारा हिने वयाच्या सहाव्या वर्षी दि. ४ नोव्हेंबर २०२० रोजी १४३ कि.मी. आंतर केवळ १२ तासांमध्ये सायकलिंग करून पार केले. या तिच्या कामगिरीची दाखल घेऊन, वर्ल्ड रेकॉर्ड्स  इंडिया ने तिचा गौरव केला. स्वराच्या या यशाबद्दल  विविध संस्था, संघटना व मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

    कु. स्वरा योगेश भागवत हिने दि. ४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ३.४५ मिनिटांनी  गोखळी येथून सायकल प्रवास सुरु करून, बारामती, मोरगाव, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, राजाळे परत गोखळी  रेकार्ड ४ नोव्हेंबर २०२० रोजी पूर्ण केले. खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये सायकलिंग करून सहाव्या वर्षी रेकॉर्ड केले, या  कामगिरीची  " वर्ल्ड रेकॉर्ड्स  इंडिया " यांनी नोंद घेऊन,   नुकतेच तिला प्रमाणपत्र,गोल्ड मेडल, ट्राफी देऊन तिचा गौरव केला. 

    कु. स्वरा योगेश भागवत ( जन्म तारीख १५ ऑक्टोबर२०१४) वयाच्या तिसऱ्या वर्षी पोहणे,धावणे याबरोबरच सध्या एका मिनिटात 100, पुशअप्स, 50 प्रकारच्या विविध दोरी उड्या, ट्रेकींग, दोर चढणे, जोर, सूर्यनमस्कार ,योगा, कुस्ती इ. व्यायाम प्रकार नियमित करत असते.

No comments