Breaking News

शैक्षणिक क्षेत्रातील विशाल भरारी घेणारे नेतृत्व

Happy birth Day Vishal Pawar - from Progressive Convent School and Junior College Kolaki-Gunavare Phaltan
आपल्या स्वतःच्या जिद्द चिकाटी व अविरत संघर्षाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार संपन्न समाज विकासाचा ध्यास घेऊन जगणारे, विचारशील, संयमी व प्रसंगी आक्रमक व अभ्यासू असणारे,धडपड आणि सततचा संघर्ष त्यांच्या जीवनाचे जणू काही काव्य बनून राहिले ते आपल्या यशस्वी संघर्षपूर्ण वाटचाली ने फलटण तालुक्याच्या क्षितिजावर,शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या उत्साही व मनमिळावू स्वभावाने नवचैतन्य निर्माण करणारे, कार्यकुशल व कर्तव्यनिष्ठ प्रेरणादायी, युवा नेतृत्व म्हणजे आमच्या सरस्वती शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव श्री विशाल पवार यांचा आज दि. ८ डिसेंबर रोजी वाढदिवस संपन्न होत आहे.  वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.....!

    आजच्या युगात शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात निर्मिती व सर्जनशीलतेला प्राधान्य देऊन शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारशील व कौशल्यपूर्ण सक्षम पिढी घडविण्याच्या उदात्त हेतूने फलटणच्या शैक्षणिक क्षितिजावर आपल्या नाविण्याचा ठसा उमटवणाऱ्या सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल व जुनिअर कॉलेजची स्थापना कोळकी सारख्या ग्रामीण भागात करण्याची कल्पना ही १६ वर्षापूर्वी विशाल सरांच्या मनात रुजली व ती कृतीत आणण्यासाठी, सततचा संघर्ष करण्याची जिद्द ही कायम ठेवलेली त्यांच्या यशस्वी वाटचालीतून दिसून येते. श्रीमंतीची मक्तेदारी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची कवाडे ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोर गरीब मुलांना सहजा सहज  साध्य उपलब्ध व्हावीत ही आशा बाळगून, १३ वर्षापूर्वी कोळकी येथे व ६ वर्षांपूर्वी गुणवरे येथे इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या, ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची खरी तळमळ होय. या दोन्ही शाळा आज शिक्षण कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. या यशामागे त्यांच्या ठायी असणाऱ्या विशेष नेतृत्वगुणांचा संदर्भ तसेच आई-वडिलांची समर्थ साथ प्रेरणा दिसून येते.

    सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही कोणत्याही परिस्थितीत त्याचा बाऊ  न करता संयम व  धैर्याने येणाऱ्या संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास हा त्यांच्या स्वभावाचा निराळा पैलूच  आहे. ग्रामीण भागात जन्म झाला असल्याने त्या भागातील समाजाच्या शैक्षणिक व मूलभूत गरजांचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना होता. त्यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण झाली व आजही इतरांच्या सुख-दुःखात, संकट समयी मदतीचा हात पुढे करून सामाजिक उत्तरदायित्व नेहमीच जोपासतात. आई-वडिलांनी रुजवलेल्या संस्कारामुळे व आदर्श कौटुंबिक विचारांचा वारसा लाभल्याने कोणत्याही परिस्थितीवर हार न मानता सर्वांना बरोबर घेऊन तितक्याच निष्ठेने हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव, प्रत्येकाशी आपुलकीने व नम्रतेने संवाद साधून, सर्वांशी विश्वासाचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करून मोठा मित्रपरिवार व जनसंपर्क तयार झालेला दिसतो. त्यामुळे जनसामान्यात व समाजात त्यांची एक वेगळीच प्रतिमा ठसा उमटवीत आहे त्यांच्या ठायी असणाऱ्या  उत्तम संवाद कौशल्य, अभ्यासपूर्ण निर्णय क्षमता, चिकित्सक विचार शैली व संयम  त्यामुळे त्यांच्या यशस्वी कार्याला वेगळी दिशा मिळाते.

    शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना प्रत्येक विद्यार्थी हा ज्ञानाबरोबरच सुसंस्कृत व आव्हान पेलण्यास सक्षम जबाबदार घडलाच पाहिजे त्यांच्या अंगी स्वावलंबन रुजवून कौशल्य निर्माण करावीत यासाठी विविध शैक्षणिक व नाविन्य उपक्रमासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. विद्यार्थ्यांची आरोग्य, गुणवत्ता विकास क्रीडा कौशल्य यासाठी आदरणीय संचालिका सौ. संध्या गायकवाड मॅडम यांचे विचार घेऊन शिक्षक पालक व समाजातील तज्ञ व्यक्ती मार्फत   बहुमोल मार्गदर्शन केले जाते.

    विविध जाती- धर्मातील लोकांना आपुलकीची व सन्मानाची आपलेपणाची वागणूक त्यामुळे सर्वांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट स्वभाव      वैशिष्ट्ययामुळे त्यांचे विविध सामाजिक राजकीय औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात दिग्गज, व्यक्ती अधिकारी यांच्याशी आपुलकीचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

    समाजाबरोबर ज्ञानसेवेचा अखंड ध्यास घेऊन जगणारा हे व्यक्तिमत्व समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी स्वतःचे आरोग्य व दुःख बाजूला ठेवून अहोरात्र झिजताना व झटताना दिसून येत. नेहमीच  ज्ञान मुक्त शिक्षणाला प्राधान्य देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेतात. त्यांच्या या नावीन्यतेमुळे, कल्पक विचारांमुळे सरस्वती शिक्षण संस्था यशस्वी गरुड झेप घेत आहे.
 सामाजिक क्षेत्रात त्यांचे अभूतपूर्व असे कार्य पुरग्रस्तांना  जीवनावश्क वास्तूचे वाटप तसेच वृध्द आश्रम व अनाथ आश्रमनां मदत, रक्तदान शिबीराचे आयोजन व तसेच कोरोना काळातील परिस्थितीचा विचार करून सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून कोळकी परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सरस्वती शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले त्याच बरोबर कोरोना युद्धांचा सन्मान व त्यांनाही अल्पोपहार ची किट वाटण्यात आले. अशा अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग.

    मा. विशाल सर आपल्या शैक्षणिक व सामाजिक व राजकीय कार्याची क्षितीजे  दिवसेंदिवस विस्तारित रहावो. आपणास व आपल्या कुटुंबियांस सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व कर्मचारी यांच्या वतीने आरोग्यदायी आनंददायी समृद्ध दायक चिरंतर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!!!!!

- सरस्वती शिक्षण संस्था संचलित 
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज 
कोळकी- गुणवरे, फलटण.

No comments