Breaking News

सोमंथळी येथे चोरी करण्याच्या हत्यारासह थांबलेल्या संशयितास अटक

Suspect arrested at Somanthali

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ ऑक्टोबर - सोमंथळी ता. फलटण गावच्या हद्दीत अंधाराचा फायदा घेऊन, गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने, चोरी करण्याच्या हत्यारासह थांबलेल्या संशयितास पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12/10/2021 रोजीचे रात्री. 00.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस पेट्रोलींग करताना, फलटण ते सांगवी रोडने मौजे सोमंथऴी गावचे हद्दित आले असता, सोमंथळी ग्रामपंचायतच्या आडोशाला अंधारात एक इसम आपले अस्तीत्व लपवुन उभा असलेचा दिसला,  त्याची विचारपुस केली असता, त्याचे नाव राजेश दत्तात्रय आगवणे वय-27 वर्षे रा. सांगवी ता. फलटण जि. सातारा असे सांगीतले, त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ चोरी करण्याची हत्यारे सापडली. 

    पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस हवालदार ए. एस. कर्णे हे करीत आहेत.

No comments