Breaking News

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश किसन वीर यांचे निधन

Senior NCP leader Suresh Kisan Veer passes away

    सातारा :  स्वातंत्र सैनिक किसन वीर यांचे पुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश किसन वीर उर्फ (आण्णा)  यांचे  वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सत्यजित व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

    जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसन वीर यांचे ते जेष्ठ चिरंजीव होत. किसन वीर यांच्या नंतर वाई तालुका व कवठे येथील राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता.  ते किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते माजी चेअरमन होते. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी अतिशय उल्लेखनीय, आदर्शवत व शिस्तबद्ध काम करून दोन्ही संस्थांचा लौकिक वाढविण्यात मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.

No comments