ट्रॅक्टर समोर दुचाकी सोडून चालकास दगडाने मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ ऑक्टोबर - शेतातील फनपाळी चे काम करून तथवडा येथील युवक ट्रॅक्टर वरून घरी जात असताना, एकाने मोटरसायकल ट्रॅक्टरच्या समोर सोडून बाजूला उडी मारली, व चालकास दगडाने मारहाण केली, तसेच इतर दोघांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ताथवडे येथील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१७/१०/२०२ राेजी ११.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे ताथवडा ता. फलटण गावचे हद्दीत पोपट शंकर शिंदे यांचे घराचे समोर सार्वजनिक रस्त्यावरून प्रज्वल प्रदीप शिंदे वय 19 वर्षे रा. ताथवडा हा त्याच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच 11 बी झेड 978 वरून रंजीत जाधव यांचे शेतातील फनपाळी करून घरी जात असताना, समोरून श्रीधर कल्याण खराडे हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक एम एच 11 बी क्यू 5255 ही, जोरात घेऊन येऊन, ट्रॅक्टर समोर मोटर सायकल सोडून, बाजूला खाली उडी मारुन तो पडला. त्यावेळी त्याने तेथे पडलेला दगड हातात घेऊन, प्रज्वल शिंदे याच्या मानेखाली, पाठीत जोरात फेकून मारला त्यात प्रज्वल प्रदीप शिंदे यास मुक्का मार लागला आहे. त्यानंतर जयश्री कल्याण खराडे व कल्याण पांडुरंग खराडे सर्व रा. ताथवडा ता.फलटण यांनी प्रज्वल प्रदीप शिंदे यास शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद श्रीधर कल्याण खराडे यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत. दरम्यान झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
No comments