ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न ; ६ जणांवर गुन्हा दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ ऑक्टोबर - ताथवडा येथील युवक मोटर सायकलवरून आपल्या घरी जात असताना, यात्रेतील भांडणाचा राग मनात धरून, त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तथावडा येथील ६ जणांच्या विरोधात आयपीसी कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७/१०/२०२ राेजी ११.०० वाजण्याच्या सुमारास, मौजे ताथवडा ता. फलटण गावचे हद्दीत उत्तम एकनाथ शिंदे यांचे घराचे समोर सार्वजनिक रस्त्यावरुन श्रीधर कल्याण खराडे वय 29 वर्ष रा. ताथवडा हे आपल्या मोटर सायकल वरून घरी जात असताना, प्रज्वल प्रदीप शिंदे याने, पूर्वीचा यात्रेतील भांडणाचा राग मनात धरून, श्रीधर खराडे यास, तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याच्या उद्देशाने, श्रीधर कल्याण खराडे च्या मोटरसायकलला ठोकर देऊन, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपी क्र.२) पुष्पा प्रदीप शिंदे ३) प्रदीप रंगराव शिंदे ४) युवराज मधुकर शिंदे ५) शंभूराज मधुकर शिंदे ६) प्रसाद गोरख शिंदे सर्व रा. ताथवडा ता.फलटण जि. सातारा यांनी श्रीधर खराडे याच्या मोटरसायकलवर दगड मारून नुकसान केले असल्याची फिर्याद श्रीधर खराडे यांनी दिली आहे त्यानुसार ताकतोडा येथील सहा हजारांच्या विरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ए.ए. सोनवणे हे करीत आहेत. दरम्यान झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
No comments