Breaking News

सरडे येथे कत्तलीसाठी नेण्यात येणारी १७ जनावरे पकडली ; ११ लाख ७० हजरांचा मुद्देमाल जप्त

At Sarde, 17 animals were seized for slaughter; 11 lakh 70 thousand items confiscated

    फलटण( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ ऑक्टोबर - सरडे तालुका फलटण गावच्या हद्दीत दोन महिंद्रा पीकअप वाहनात १७ गोवंशीय जनावरे डांबून ठेवून ती कत्तलीसाठी नेत असल्याचे स्थितीत सापडली असता, फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, १७ गोवंशीय जनावरांची सुटका केली.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळालेल्या खबरीच्या  अनुषंगाने ग्रामीण पोलिसांनी सरडे तालुका फलटण येथील पाल वस्ती येथे, दि. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्री छापा टाकला असता, गफूर हुसेन शेख  व सुलेमान गफुर शेख दोन्ही रा. सरडे, मुस्लिम वस्ती पाल ता. फलटण यांनी,  महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पीकअप गाडी क्रमांक एम एच ११ टी ४९१२ व महिंद्रा पिकअप एम एच १० सी आर ००१९ यामध्ये कोणतीही खरेदीची पावती नसताना,  १ लाख ७० हजर रुपये किमतीची एकूण १७ जर्शी जातीची लहान खोंडे,  डांबून दाटीवाटीने कोंबून ठेवलेली दिसली व त्यांना खाण्यापिण्याची कोणतीही सोय न करता, ती जनावरे नंतर अकलूज या ठिकाणी बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी  बिगर परवाना घेऊन जाणार असल्याने डांबून ठेवलेल्या स्थितीत मिळून आली. या छाप्यात ग्रामीण पोलिसांनी दोन्ही पीकअप व सतरा वर्षे जनावरे असा एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    अधिक तपास पोलीस हवालदार  ए.एन.टिळेकर हे करीत आहेत.

No comments