श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या सायकल राईड मध्ये 971 स्पर्धकांचा सहभाग
५७ कि.मी. सायकल राईड पूर्ण केलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देताना आ. दिपकराव चव्हाण , श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, डॉ. सौ. मीरा मगर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० ऑक्टोबर -: पर्यावरणाचा ढासळता समतोल, त्याचा मानवी आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्याबरोबर आरोग्य सुधारण्यासाठी शक्य असेल तर स्वयंचलीत वाहनांऐवजी पायी चालणे व सायकल वापरणे अत्यंत उपयुक्त असून त्या पार्श्वभूमीवर फलटण सायकल असोसिएशनच्या माध्यमातून सुरु असलेले प्रयत्न प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ. दिपकराव चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ५७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण सायकल असोसिएशनने फलटण ते बारामती व परत अशा ५७ कि. मी. अंतराच्या सायकल राईडचे आयोजन केले होते. त्याचा समारोप व यशस्वी स्पर्धकांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आ. दिपकराव चव्हाण उपस्थित होते. श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी होत्या तसेस जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, बिल्डर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष रणधीर भोईटे, फलटण अध्यक्ष शफीक मोदी, क्रेडाईचे महेंद्र जाधव, सर्व नगरसेवक/नगरसेविका, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, माळजाई उद्यान समितीचे प्रतापराव निंबाळकर, सायकल असोसिएशन नियोजन समितीचे सर्व सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. संजय राऊत, डॉ. हेमंत मगर, डॉ. सौ. मीरा मगर यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
५७ कि.मी. सायकल राईडचा शुभारंभ करताना नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. हेमंत मगर, डॉ. संजय राऊत, डॉ. सौ. मीरा मगर |
रविवारी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर छ. शिवाजी महाराज चौकातून नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. हेमंत मगर, डॉ. संजय राऊत, डॉ. सौ. मीरा मगर वगैरे मान्यवरांच्या हस्ते सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. सायकल राईड मध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले 717 स्पर्धक व ऑफलाइन रजिस्ट्रेशन केलेले 154 स्पर्धक आशा एकूण 971 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
बारामती येथे झेंडा दाखवताना बिल्डर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष रणधीर भोईटे, विक्रम झांजुर्णे, महेश गरवालिया, बाबासाहेब तावरे |
अस्थीरोग तज्ञ डॉ. मयूर फरांदे यांनी ही स्पर्धा 57 km धावत जाऊन पूर्ण केली तर कु. स्वरा भागवत या छोट्या मुलीने या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविताना इतरांना प्रोत्साहन दिले.
मुधोजी क्लब मैदानावर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना सन्मानपत्र व मेडल देवून फलटण सायकल असोसिएशनच्यावतीने सर्वांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
No comments