24 ऑक्टोंबरपर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण मोहिम सप्ताह
सातारा (जिमाका): रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने 24 ऑक्टोंबर 2021 पर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 10 वर्षाआतील पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, RVG 202 व BDNGL 798 या वाणांचे एकूण 89606 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रात्यक्षिके अंतर्गत 22339 क्विंटल हरभरा बियाणे मोफत तिवरीत करण्यात येणार आहे. या अभियानात प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
2021-22 बियाणे व लागवड उपभियानांतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम अंतर्गत 10 वर्षावरील जॉकी-9218 या वाणाचे एकूण 8500 क्विंटल प्रमाणित बियाणे रक्कम 2500 प्रति क्विंटल अनुदानावर वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेत प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच या मोहिमेंतर्गत हरभरा बियाण्यास बिजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन करुन बिजप्रक्रीयेचे महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे.
No comments