Breaking News

विडणी येथील युवकास कागदपत्रांची पूर्तता करूनही वीज कनेक्शन मिळेना

The youth from Vidani did not get electricity connection even after fulfilling the documents

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ सप्टेंबर - वीज कनेक्शन मिळवण्यासाठी मागील कित्येक महिन्यांपासून प्रयत्न करत असून, वीज कनेक्शन घेण्यासाठी लागणारी सर्व पूर्तता पूर्ण केली आहे, परंतु मला  वीज कनेक्शन मिळत नाहीये,  विडणी येथील  वीज वितरणचे अधिकारी जाणून-बुजून वीज कनेक्शन देण्यासाठी विलंब लावत असल्याची खंत विडणी येथील सचिन दशरथ  मोहिते यांनी दैनिक  गंधवार्ताशी बोलताना व्यक्त केली.

    याबाबत सचिन दशरथ मोहिते यांनी सांगितले की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदायी प्रकाश योजने अंतर्गत आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन, सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्याचबरोबर दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी,  कोटेशनचे २५० रुपये  भरलेले आहेत. 'मीटर इन्स्टॉल्ड' असा महावितरणचा मेसेजही फोनवर आला आहे. 202290509965 हा आपला ग्राहकक्रमांक आहे. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून वीज कनेक्शनसाठी महावितरणच्या विडणी येथील कार्यालयात आपण हेलपाटे मारत असून, या ठिकाणच्या उपभियंत्याकडून आपल्याला उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे  सचिन मोहिते यांनी सांगितले.
    वास्तविक वीज कनेक्शन घेण्यासाठी मी मागील ६ ते ७ महिन्यांपासून हेलपाटे मारत आहे. कागदपत्रांची पूर्तता करत करत, मी दि.  ऑगस्टमध्ये कोटेशनचे फी भरून वीज कनेक्शन मिळण्याची प्रक्रिया पूर्ण केली, परंतु अद्यापही मला वीज कनेक्शन मिळत नाही माझ्यावर होणारा अन्याय दूर व्हावा अशी विनंतीही सचिन मोहिते यांनी केली आहे.

No comments