Breaking News

वडजल येथे दुचाकी व इर्टीगा गाडीचा अपघात ; एक ठार

Two-wheeler and Ertiga accident at Vadjal; One killed

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ सप्टेंबर२०२१ - वडजल ता. फलटण येथे पुणे - पंढरपूर महामार्गावर  दुचाकीस  इर्टीगा गाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एक ठार झाला आहे.

    अधिक वृत्त असे, दि 31/08/2021 रोजी सायंकाळी 5.30 वा चे सुमारास मौजे वडजल ता फलटण गावी पुणे ते पंढरपुर महामार्गावर  वडजल चौकात वाठार निंबाळकर गावाच्या बाजुकडुन वडजल बाजुकडे आलेले मोटर सायकलस्वार बाळासाहेब तात्याबा वायदंडे रा मलटण, फलटण यांचेकडील मोटार सायकल क्रमांक MH 11/ AD- 7628 यास फलटणकडून पुण्याकडे चाललेल्या रणजित शंकर जानकर रा.वळई म्हसवड ता. माण याने त्यांच्या ताब्यातील मारुती ईर्टीगा गाडी क्रमांक MH 11 /CH 6830 ही भरधाव वेगात चालवुन, मोटार सायकलला जोराची धडक देवुन, मोटार सायकल स्वारास गंभीर जखमी केले. जखमी बाळासाहेब वायदंडे  यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेले, उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले असल्याची फिर्याद मुन्ना  इनामदार  रा.वडजल ता.फलटण यांनी दिली आहे. 

No comments