Breaking News

फलटण नगर परिषदेने कोरोना काळातील महसूल कर माफ करावा - मागणी

Phaltan Municipal Council should waive revenue tax during Corona period - Demand

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० सप्टेंबर -  कोरोनाच्या भीषण परिस्थिती मध्ये अनेक नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली असून, नागरिकांपुढे रोजच्या जगण्याचा बिकट प्रश्न समोर असताना, फलटण नगर पालिका प्रशासन मात्र महसूल कर माफ करण्या ऐवजी, या करावर भरमसाठ दंड आकारत आहे,  या दंडाची तुलना केली असता  बँका किंवा खाजगी सावकारांच्या व्याजापेक्षा जास्त हा दंड आकारला जात आहे . 

    मलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या कु कांचनकन्होजा खरात व फलटण पालिकेतील गटनेते नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन कोरोना काळातील सर्व कर व त्यावरील सर्व दंड माफ करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

    याच बरोबर महिला सबलीकरण अंतर्गत महिलांच्या नावावर असणाऱ्या सर्व मिळकतीवर ५०% महसूल शुल्कमाफी देण्यात यावी अशीही मागणी खरात यांनी केली, यावेळी नगरसेवक अशोक जाधव यांनी या पद्धतीची कर माफी इतर काही पालिकां मध्ये केली असल्याचे व फलटण नगर पालिकेने अशी कर माफी त्वरित करावी अशी मागणी केली.

    या पूर्वीही पालिका प्रशासनाकडे अशी मागणी केली होती परंतु यावर कोणताही सकारात्मक निर्णय पालिका प्रशासन घेऊ शकले नाही . या वेळी मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन असा निर्णय घेऊ शकते.

    कोरोना काळात जनसामान्यांचे जगणे हलाखीचे झाले असताना महसूल करावर सावकारी दंड आकारून नागरिकांच्यावर अन्याय केला जात आहे . त्यामुळे कोरोना काळातील सम्पूर्ण कर व त्यावरील दंड माफ करण्यात यावा असे कांचनकन्होजा खरात यांनी मागणी केली.

No comments