Breaking News

भिक्षेकरी गृहाला भेट देऊन भिक्षेकऱ्यांच्या पाठीवर यशोमती ठाकुर यांचा मायेचा हात

Minister Yashomati Thakur visits Bhikshekari Griha in Satara

    सातारा   ( जिमाका )   राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सातारा येथे भिक्षेकरी गृहाला भेट दिली. बालविकास आयुक्तालय पुणे संचलित या भिक्षेकरी गृहातील वृद्धांची आस्थेनी चौकशी करत विचारपूस  केली. त्यांना काय समस्या आहेत त्यांची माहिती घेऊन त्या समस्या सोडवण्याचे तातडीने आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

      विविध कारणांनी बेघर झालेल्या तसेच परिस्थितीमुळे ठिकाणी भिक्षा मागणाऱ्याची रवानगी भिक्षेकरी गृहात करण्यात येते अशा वृध्दांना त्यांच्या भविष्यासाठी  व्यक्तिगत विकासाच्या अनेक योजना शासनामार्फत राबविल्या जातात अशा वृद्धांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी राज्याचे महिला आणि बालविकास विभागामार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवरच  यशोमती ठाकूर यांनी या वृद्धांची विचारपूस करून त्यांना धीर दिला भविष्यातील संधीबाबत त्यांच्याशी चर्चा केली तसेच काहीही मदत लागल्यास विभागामार्फत त्याची पूर्तता होईल असे आश्वासनही या मुलांना दिले.

No comments