Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर ४८ जणांना केले तात्पुरते तडीपार ; रोज हजेरी बंधनकारक

48 people were temporarily deported on the backdrop of Ganeshotsav; Mandatory daily attendance

        फलटण दि.१० सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) -  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ४८ जणांना तात्पुरत्या स्वरूपात तडीपार करण्यात आलेले आहे, तसेच या ४८ जणांना बरड दूरक्षेत्र येथे रोज हजरी लावणे बंधनकारक  करण्यात आले आहे.

    गणेशोत्सव सणाचे पार्श्वभुमीवर फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहवी याकरीता फलटण शहर पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे, पोलीस रेकॉर्डवरील, तसेच मागील गणेशोत्सव काळात झालेल्या भांडणामधील आरोपीत इसम, तसेच ज्यांचेवर खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दुखापत तसेच गर्दी व मारामारी तसेच शस्त्रास्त्र जवळ बाळगणारे इत्यादी स्वरुपात गुन्हा दाखल असणाऱ्या इसमांच्या विरुध्द सीआरपीसी १४४ अन्वये तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करावे असा उपविभागीय अधिकारी, फलटण यांना प्रस्ताव पाठविला असता, उपविभागीय अधिकारी श्री शिवाजीराव जगताप यांनी खालील इसमांना दिनांक १५/९/२०२१ ते १९/९/२०२१ रोजी पर्यंत गणेशोत्सव शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात तडीपार कारवाई करण्यात आलेले आहे.

    गणेशेत्सव काळात तात्पुरत्या स्वरुपात तडीपार करण्यात आलेल्या इसमांची नावे पुढील प्रमाणे १. राम वसंत पवार २. राकेश राजेश पवार ३. रोहित संतोष अडागळे ४. उमेश नरसिंह पवार ५.लखन वसंत पवार ६. मंगेश प्रमोद आवळे सर्व रा. सोमवारपेठ फलटण ७ अमर उर्फ चंगु भगवान शिरतोडे रा. उमाजीनाईक चौक ८. अभिजीत पांडुरंग पवार रा. पवारगल्ली ९ राहुल अंबादास गवळी १०. रोहन सुभष मदने ११. कुणाल लालासो भंडलकर १२.राजु बाळासाहेब शिरतोडे सर्व रा.उमाजी नाईक चौक १३. ज्ञानेश्वर हणुमंत शिंदे १४ मयुर किसन शिंदे १५. किसन बाबूराव शिंदे १६ हणमंत बाबुराव शिंदे १७ सुर्यकांत हणुमंत शिंदे १८. शिवाजी गेनबा शिंदे १९. स्वप्नील शिववाजी शिंदे २०. रामदास माणिक शिंदे २१.अमोल किसन शिंदे २२. किसन गेनबा शिंदे सर्व रा. ठाकुरकी २३ विजय सदाशिव गिरी रा.मलठण २४.मनोज राजेंद्र हिप्परकर २५ नवनाथ तुकाराम पवार २६. विलास तुकाराम पवार २७ राहुल गणेश / रमेश पवार २८.दिलीप तुकाराम पवार २९. साहिल विलास पवार ३० रुपेश विलास पवार ३१. रमेश तुकाराम पवार ३२. वरुण नरेंद्र कुचेकर ३३. रोहन रमेश पवार ३४. लहु रामस्वामी जाधव ३५ विशाल शंकर पवार ३६. अजित शंकर पवार ३७.बाबु शंकर पवार ३८. रोहण गंगाराम पवार ३९. अरुण मारुती पवार ४० विक्रांत ऊर्फ गोटु वसंत निंबाळकर सर्व रा. सोमवारपेठ ४१ मनोज गणेश इंगळे रा. मंगळवारपेठ ४२. शिवाजी ऊर्फ शाहुजी बंडु मदने रा. उमाजी नाईक चौक ४३ विजय नरसिंह पवार ४४. अरुण नरसिंह पवार ४५. मिथुन सायबु जाधव ४६. मंगेश नरसिंह पवार ४७. संजय महादेव गायकवाड सर्व रा. सोमवारपेठ , ४    म सुभाष अहिवळे रा. मंगळवार पेठ, फलटण

    तडीपार करण्यात आलेल्या पोलीस रेकॉर्डवरील इसम यांना पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहेत.

    वरील नमुद इसमांनी दिनांक १५/९/२०२१ ते १९/९/२०२१ या कालावधीत फलटण नगरपरिषद हद्दीत व कोणत्याही धार्मीक मिरवणुकीत अथवा कार्यक्रमात उपस्थित राहु नये तसेच या दरम्यान त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठणे अंतर्गत बरड पोलीस दुरक्षेत्र येथे दररोज हजेरी करीता उपस्थित राहवे असे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे फलटण शहर पोलीस ठाणे यांनी कळविले आहे.

No comments