Breaking News

सर्व तालुक्यांसह सातारा मुख्यालय येथे 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोअदालतीचे आयोजन

Organizing of  Rashtriy Lok Adalat on 25th September at Satara Headquarters with all Talukas

      सातारा, दि. 21 (जिमाका): सातारा मुख्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीचा लाभ विधीज्ञ व पक्षकार यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.

    लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते होणार असून या लोकअदालतीमध्ये भूसंपादन प्रकरणे, धनादेश न वटलेली प्रकरणे, फी संबंधी प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, सर्व प्रकारचे दिवाणी दावे व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे. लोकअदालतीमध्ये न्यायाधीश व सरकारी वकील तडजोड घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत. तरी पक्षकारांनी न्यायालयात 10.15 वाजता उपस्थित रहावे.

    कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्या पक्षकारांना व्यक्तिश: लोकन्यालयात उपस्थित राहता येत नाही. म्हणजे गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, विकलांग, कोरोना रुग्ण, आजारी रुग्णांना या लोकन्यायालयामध्ये यशस्वी तोडजोड करण्यासाठी इच्छुक असेल अशा पक्षकारांना सहभाग घेण्यासाठी वॉटस्अप सुविधेचा उपयोग केला जाणार आहे.  या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होवून लोकअदालतीचा लाभ विधीज्ञ व पक्षकारांनी घ्यावा.

No comments