Breaking News

आरटीओ सातारा येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

Auction of seized vehicles at Sub Regional Transport Office, Satara, 

    सातारा, दि. 21 (जिमाका):  मोटार वाहन कर न भरलेल्या  व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 22 वाहनांचा जाहिर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्यात आला असल्याची माहिती कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.

    लिलावाचे अटी व नियम मंगळवार दि. 21 सप्टेंबर पासुन कार्यालयीन कामकाजा दिवशी  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील नोटीस बोर्डावर सकाळी 11 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. वाहने जशी आहे तशी या तत्वावर जाहिर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

    कोणतेही कारण न देता  जाहिर लिलाव रद्द करण्याची अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, सातारा यांनी  स्वत:कडे राखुन ठेवले आहेत.

No comments