Breaking News

कोरोना रुग्णात वाढ! फलटण तालुक्यात 71 कोरोना बाधित

Increase in corona patients! 71 corona affected in Phaltan taluka

    फलटण दि. 22 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 21 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 71 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 9 रुग्ण तर ग्रामीण भागात 62 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक पिंप्रद व आरडगाव येथे प्रत्येकी 9 रुग्ण सापडले आहेत.    

    फलटण तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, यामुळे चिंता वाढली आहे.  नागरिकांनी तसेच प्रशासनाने सावधान झाले पाहिजे.  नागरिकांनी कंपल्सरी मास्कचा वापर  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा पुन्हा रुग्ण वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. 

    काल  दि. 21 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 71 बाधित आहेत. 71 बाधित चाचण्यांमध्ये 47 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 24 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 9 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  कांबळेश्वर 1, कोळकी 3, कुरवली खु 2, पिंप्रद 9, विडणी 6, राजुरी 2, शेरेचीवाडी 1, सांगवी 3, सोनवडी 1, जाधववाडी 3, अंडरुड 1, टाकळवाडा 1, आरडगाव 9, आसू 1, गोखळी 1, गुणवरे 2, पाडळी ता खंडाळा 1, खराडेवाडी 1, बरड 4, मांडवखडक 1, मानेवाडी 1, गिरवी 2, फरांदवाडी 1,  साखरवाडी 1, दुधेबावी 1,  चौधरवाडी 1, तरडगाव 1, वाटर स्टेशन तालुका कोरेगाव 1 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments