Breaking News

गाडी अडवून मारहाण ; सरडे येथील 5 जणांच्या विरोधात गुन्हा

Crime against 5 persons in Sarde for obstructing and beating 

    फलटण दि.२२ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - सरडे ता. फलटण गावच्या हद्दीत  पिकअप गाडी अडवून, तू माझ्या घराकडे का सारखा बघतोस असे म्हणून दोघांना मारहाण, शिवीगाळी व दमदाटी केल्या प्रकरणी सरडे येथील पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 20/9/2021 राेजी सकाळी  10.15 वा. सु. माैजे सरडे गावच्या हद्दीत सुखदेव भंडलकर यांचे घराचे जवळ, विजय भानुदास धायगुडे हे पिकअप गाडीने चालले असता,  आदेश सुखदेव जाधव रा. सरडे यांनी विजय भानुदास धायगुडे यांची पिकअप गाडी अडवून,  म्हणाला की, तू माझ्या घराकडे का सारखा बघतोस,  असे म्हणून शिवीगाळी व दमदाटी करून विजय भानुदास धायगुडे यांना धरून, छातीस धक्काबुक्की केली. तसेच विक्रम लालासो जाधव, मुन्ना जयसिंग भंडलकर, सुधीर लालासो जाधव, कृष्णा रामचंद्र चव्हाण सर्व रा. सरडे यांनी विजय भानुदास धायगुडे यांच्या घरासमोर येऊन, तू आमचे घराकडे व आमच्या माणसांकडे का बघून, आम्हाला त्रास देतो असे म्हणून विजय भानुदास धायगुडे यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच, विजय भानुदास धायगुडे यांचा भाऊ यांच्यावर दगडफेक करून त्यांचा एक दात मोडला असल्याची फिर्याद विजय भानुदास धायगुडे यांनी दिली आहे.

    अधिक तपास पोलीस हवालदार ए. एन. टिळेकर हे करीत आहेत.

No comments