8 सप्टेंबर रोजी जप्त वाहनांचा ई-लिलाव
सातारा (जिमाका): मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या 22 वाहनांचा ई-लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
या जाहिर लिलावत सहभागी होण्यासाठी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. ई-लिहाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा, तहसील कार्यालय सातारा, वाई, माण, कोरेगाव, महाबळेश्वर आणि जावली आणि उपप्रादेशिक परिहवन कार्यालय सातारा यांच्या सुचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत.
No comments