नितीन गडकरी यांच्या हस्ते रस्ते विकास कामांचा लोकार्पण व कोनशीला अनावरण कार्यक्रम
फलटण तालुक्यातील दोन रस्त्यांचा समावेश
सातारा, दि. 23 (जिमाका): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कराड येथील द फर्न रेसीडन्सी येथे एकूण 5 हजार 971 कोटी रुपयांचे 403 किलोमीटर लांबीच्या विविध रस्ते विकास कामांचा लोकार्पण व कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कराड येथे होणा-या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या रस्त्यांच्या सुधारणा कामांचे कोनशीला अनावरण करण्यात येणार आहे. या सर्व मार्गामुळे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी चांगली सुविधा होणार आहे.
कोनशीला अनावरण
मसूरफाटा, इंदोली, काशिळ रस्ता अपघात प्रवण क्षेत्र सुधारणा
मिरज शहरांतर्गत रस्त्यांची एक वेळ सुधारणा
आजरा-अंबोली संकेश्वर भागाचे उन्नतीकरण
कळे-कोल्हापूर भागाचे उन्नतीकरण
घाटमाथा ते हेळवाक भाग मजबुतीकरण
लोकार्पण समारंभ
तासगाव ते शिरढोण भागाचे उन्नतीकरण
सेंट्रल रस्ते निधी अंतर्गत कामे
पाटण तारळे काशिष्ठ १९ कि.मी. रस्त्याची सुधारणा
वेल्हे जेजुरी लोणंद- सातारा ३.४० कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुधारणा
शिरसावडी शेणवडी खेराडे भागाच्या १२ कि.मी. रस्त्याची त्याची सुधारणा
मांडवे-नागठाणे-नांदगाव कि.मी. २ ते ९.४ या ७.४० किमी रस्त्याची सत्याची सुधारणा
फलटण- आसु-तावशी या जिल्ह्यांच्या सीमा एकूण २८ किमी. रस्ते सुधारणा
फलटण-उपलवे-कुलकजाई या जिल्हा रस्ता ६७ मध्ये कि.मी. २२.४ ते २६.४ या ५ कि.मी. रस्त्याची सुधारणा
No comments