सातारा जिल्ह्यात 449 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यू
985 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 449 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
जावली 16 (9882), कराड 56 (38321), खंडाळा 22 (13945), खटाव 43 (24680), कोरेगांव 23 (21346), माण 22 (17192), महाबळेश्वर 12 (4613), पाटण 11 (10007), फलटण 110 (35636), सातारा 97 (49997), वाई 33 (15526) व इतर 4 (1963) असे आज अखेर एकूण 243108 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या माण 1 असे एकूण 1 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6048 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 985 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
No comments