Breaking News

फलटणच्या लोक अदालतमध्ये २२० प्रकरणे निकाली तर १ कोटी ८२ लाखांची वसुली

लोक अदालत च्या शुभारंभ प्रसंगी श्रीफळ वाढवताना न्यायाधीश सौ. अर्चना.एच. ठाकूर  

 220 cases were disposed of in Phaltan Lok Adalat and Rs. 182 lakh was recovered

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ सप्टेंबर -   जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, सातारा यांच्या आदेशानुसार व फलटण तालूका विधी सेवा समिती यांच्या वतीने फलटण न्यायालय येथे दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दिवाणी व फौजदारी मिळुन २२० प्रकरणे निकाली  काढण्यात आली. तसेच बँका, पतसंस्था, ग्रामपंचायती, महावितरण मंडळ व फायनान्स कंपनी या सर्वांची मिळुन १ कोटी ८२ लाख ४२४  रुपयांची वसुली झाली.

लोक अदालत च्या शुभारंभ प्रसंगी दिप प्रज्वलन करताना वकील संघाचे अध्यक्ष एम. के. शेडगे  

    सदर लोकअदालतमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालयीन प्रकरणे, वादपूर्व बँक प्रकरणे तसेच महिला विषयक पोटगी, कौटूंबिक छळ व हिंसाचार, चेक केसेस, तडजोड पात्र दिवाणी दावे, दरखास्त इत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती. सदर लोक अदालतीस पक्षकार, बँका, पतसंस्था, ग्रामपंचायती, महावितरण मंडळ यांनी  सहभाग नोंदविला होता.लोक अदालतमध्ये पक्षकार व विधीज्ञांचा उस्फुर्त सहभाग लाभला.

लोक अदालत चे कामकाज करताना न्यायाधीश व पॅनल अधिकारी 

    लोक अदालतीस फलटण न्यायालयातील न्यायाधीश सौ. अर्चना.एच. ठाकूर, न्यायाधीश सौ. उज्वला एम. वैद्य, न्यायाधीश सौ. शुभांगी बी. ढवळे, न्यायाधीश सौ. शितल डी. साबळे, न्यायाधीश श्री. केदार. ए. पोवार, न्यायाधीश श्री. युवराज एम. पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती अमिता गावडे, तालुका विधी सदस्य सचिव श्री गुळवे, फलटण बार असोशिएनचे अध्यक्ष श्री. एम. के. शेडगे व वकील बार असोशिएशन कमिटी सदस्य, विधीज्ञ, बँका, पतसंस्था ग्रामपंचायती महावितरण मंडळ, फलटण शहर, फलटण ग्रामीण, लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व फलटण न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद यांचा सहभाग होता. त्याच प्रमाणे पॅनेल सदस्य म्हणुन फलटण वकील संघातील विधीज्ञ यांनी काम पाहीले, त्याबददल सर्वांचे तालुका विधी सेवा समिती तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

No comments