Breaking News

नीरजच्या सुवर्ण कामगिरीचा सार्थ अभिमान

Proud of Neeraj Chopra's golden performance

गंधवार्ता SPECIAL -   नीरज चोप्रा Neeraj Chopra

    टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक च्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने सर्वोत्कृष्ट भालाफेक करत  सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरजने केलेली सुवर्ण कामगिरी ही ऑलिंपिकमधील भारताचे पहिले अथेलेटिक्स सुवर्ण ठरले आहे.  या सुवर्ण कामगिरीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. नीरज तुझे मनपूर्वक अभिनंदन.

     टोकियो ऑलिंपिक मध्ये अंतिम सामन्यात 87.58 मीटर भाला फेकून स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द अपुरे पडत आहेत. या सुवर्ण कामगिरीमुळे आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदाच ऐकायला मिळाले आहे.   मैदानी स्पर्धेमध्ये  भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राने आज इतिहास रचून कोट्यावधी देशवासीयांचे मनं जिंकली आहेत. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. नीरजच्या सुवर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री, सेलिब्रेटीज, नेते यांच्यासह देशातील कोट्यवधी जनतेने सोशल मीडियावर अभिनंदन होत आहे.   

    पानिपत हरियाणा येथील नीरज चोप्रा आणि सुरुवातीचे भाला फेकीचे प्रशिक्षण साई एनएसएनआयइ पतियाला येथे व नंतर स्वीडन येथे घेतले आहे. टोकियो ऑलिम्पिक भाला फेकीच्या अंतिम सामन्यात नीरजने पहिल्याच फेरीत ८७.०३ मी एवढ्या लांब भाला फेकला आणि तो आता पदक पटकावणार, असे सर्वांनाच वाटत होते. कारण पात्रता स्पर्धेपेक्षा त्याची ही कामगिरी नक्कीच उजवी होती. दुसऱ्या फेरीत तर नीरजने ८७.५८ मीटर भाला फेकला आणि जवळपास पदक निश्चित केले होते. तिसऱ्या फेरीत नीरजने ७६.७९ मीटर भाला फेकला होता, पण दुसऱ्या फेरीतील त्याची कामगिरी सर्वोत्तम होती. चौथ्या फेरीत नीरजचा फाऊल झाला होता, पण तरीही तो अव्वल स्थानावरच होता.

No comments