ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव उपक्रमांतर्गत गिरवी येथे वृक्षारोपण
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) - गिरवी तालुका फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उत्तम विद्या महाविद्यालय फलटण या विद्यालयातील उद्यानदूत रोहन भानुदास तावरे याने श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी येथे विविध झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भुजबळ दत्तात्रय, कुंभार गोरख, धुमाळ राजाराम, मोहिते शारदादेवी, अहिवळे रेणुका, सावंत अंकुश, फडतरे सचिन, बागुल मोहन आदी उपस्थित होते.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, प्रा. अनुपकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानदूत रोहन तावरे याने पर्यावरणाचे महत्त्व नमूद करत, झाडे नष्ट झाल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच प्रत्येकाने झाडे लावून झाडांची निगा राखणे गरजेचे असल्याचे सांगितले. सर्व कोरोना नियमांचे पालन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
No comments