Breaking News

शिंदेवाडी येथे उद्यानकन्येकडून शेतकरी वर्ग, प्रात्यक्षिके व युवक प्रशिक्षण

Farmer class, demonstrations and youth training from Udyanakanya at Shindewadi
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण या महाविद्यालयातील कु. जाधव शिवानी शरद या उद्यानकन्येने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमात, शेती विषयी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली, यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना  आंब्याची कलम, बीजप्रक्रिया व महत्त्व तसेच शेतात खते देताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिके करून दाखवली. 

    महिलांसाठी खास फळप्रक्रिया अंतर्गत पपईचा जाम बनवण्याचे प्रात्यक्षिक देखील करण्यात आले. तसेच या कार्यक्रमांतर्गत विविध विषयांबाबत शेतकरी वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

    श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. सागर निंबाळकर, प्रा. जयेश लेंभे सर, प्रा. पाटील सर, प्रा. शहा सर,  प्रा. शिंदे सर, प्रा. बनकर सर व प्रा. रणवरे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

No comments