निवडणूक आयोगाच्या स्वीप अभियानांतर्गत वाई येथे वेबीनारचे आयोजन
Organizing a webinar at Wai under the Election Commission's sweep campaign
सातारा (जिमाका) : महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या प्राधान्याच्या विषयानुसार आणि मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी निर्देशीत केल्याप्रमाणे वाई येथे आज स्वीप (Sveep) अभियान अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये स्त्रियांचा मतदार नोंदणी करिता सहभाग वाढविण्यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी बीएलओ (blo) सोबतच वाई येथील सर्व महिला बचत गटातील महिलांना सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार एकूण 62 स्त्रिया आणि बीएलओ (blo) यांनी या वेबिनार मध्ये सहभाग घेतला.
यावेळी नवीन मतदार नोंदणी कशी करावी, ऑफ लाईन आणि ऑन लाईन अर्ज कसा भरावा याचे मार्गदर्शन प्रांत राजेंद्र कुमार जाधव आणि तहसीलदार रणजित भोसले यांनी केले. महिलांना बीएलओ (blo) मार्फत फॉर्म देखील वाटण्यात आले. स्वीप (Sveep) कार्यक्रमा अंतर्गत मतदार जागृती आणि सहभाग वाढविण्याबाबत वाई तालुक्यात या वेबिनार मुळे चांगली सुरवात झाली आहे.
No comments