कै. हेमलता भोसले यांच्या स्मरणार्थ भोसले कुटुंबियांकडून श्रीराम एज्युकेशनला 1 लाख रुपये
![]() |
- श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्याकडे धनादेश सुपुर्द करताना ॲड. विजयराव भोसले व यशपाल भोसले |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण मधील सेवानिवृत्त प्राध्यापिका कै. सौ. हेमलता विजयराव भोसले यांच्या जयंती निमित्त त्यांचे स्मरणार्थ त्यांचे पती ॲड. विजयराव स. भोसले व चिरंजीव श्री. यशपाल वि. भोसले यांनी कृतज्ञता म्हणून संस्थेस रु. एक लाख एवढ्या रकमेचा धनादेश श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी कै. प्रा. सौ. हेमलता वि. भोसले यांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे संस्थेतील विविध शाखांमध्ये केलेल्या कार्याचे कौतुक संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सु. सूर्यवंशी (बेडके) यांनी केले व भोसले कुटुंबीयांनी सामाजिक भान जपल्या बद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने भोसले कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.
No comments