Breaking News

कार - दुचाकी अपघातामध्ये एक भाऊ ठार तर दूसरा जखमी

मयत- रोहित आण्णासाहेब भगत

    One killed, another injured in car-bike accident

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ ऑगस्ट  - फलटण - पंढरपूर महामार्गावर  झालेल्या दुचाकी व चारचाकी गाडीच्या अपघातामध्ये २ सख्खे भाऊ जखमी झाले होते, पैकी एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अद्यापही घटनास्थळावरून फरार झालेल्या  चालकाचा शोध ग्रामीण पोलिस घेत आहेत.

    ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक २६  ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, फलटण -पंढरपूर महामार्गावर फलटण तालुक्यातील पिंप्रद गावालगत फलटण तालुक्यातील व्यसनमुक्ती युवक संघ महाराष्ट्र प्रवेशद्वारा समोर दुचाकी क्रमांक एमएच 11 बी.डब्लू 2282 या दुचाकीचा आणि एम एच २०-एफ जी ३८०५ चारचाकी गाडीचा अपघात झाला असून, या अपघातात  शेतामध्ये शेतीला पाणी देण्यासाठी जात असताना, रोहित अण्णासाहेब भगत (वय 20, रा. पिंप्रद ता. फलटण) व तुषार अण्णासाहेब भगत (वय 22, रा. पिंप्रद ता. फलटण) हे दोन तरुण जखमी झाले होते. यातील रोहित आण्णासाहेब भगत या तरुणांचा खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    अपघातानंतर दुर्घटनेतील चारचाकी वाहनाचा चालक पसार झाला होता, धडक देणारी गाडीचा शोध घेण्यात पोलिसांनी यश मिळाले असून, चारचाकी क्रमांक -एम एच २०-एफ जी ३८०५ च्या चालकाचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत विशाल बाळासो साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कदम करीत आहेत.

No comments