Breaking News

निलेश सोनवलकर - शुभांगी महानवर विवाह सोहळा संपन्न

Nilesh Sonwalkar  Married to Shubhangi Mahanavar
    फलटण : दुधेबावी (ता.फलटण) येथील लक्ष्मण नाना सोनवलकर यांचे चिरंजीव तथा फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष निलेश सोनवलकर व येळेवाडी (ता.माण) येथील रामचंद्र महादेव महानवर यांची कन्या शुभांगी यांचा विवाहसोहळा येळेवाडी येथे कौटुंबिक वातावरणात (दि.31 जुलै रोजी) संपन्न झाला. 

    कोवीड 19 च्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यास वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष प्रा.रमेश आढाव, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा कार्यवाह, कवी ताराचंद्र आवळे, पत्रकार सुरेश भोईटे, शशिकांत सोनवलकर, राजकुमार गोफणे, वैभव गावडे, रोहित वाकडे, सुभाषराव सोनवलकर, विठ्ठल पडर, आकाश दडस, ऋषिकेश आढाव, अमित पंडीत, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ सोनवलकर , डॉ. विठ्ठल सोनवलकर, संतोष ठोंबरे, ऋषिकेश बिचुकले आदींसह सोनवलकर - महानवर कुटूंबीय उपस्थित होते. 

    विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक नवनाथ कोलवडकर व राजेंद्र खरात यांनी केले. उपस्थितांचे स्वागत विकास सोनवलकर, संत गाडगेमहाराज आश्रमशाळा, येळेवाडीचे अधीक्षक तानाजी महानवर, फौजी प्रवीण महानवर यांनी केले.

No comments