रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण संपन्न
![]() |
| शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थिनीला करताना अरुण गोडबोले शेजारी डॉ.अच्युत गोडबोले, प्रद्युमन गोडबोले ,उदयन गोडबोले |
सातारा - येथील गोडबोले कुटुंबीयांनी पन्नास वर्षापूर्वी सुरू केलेल्या गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यादानात सहकार्य व्हावे, या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाला पाहता पाहता पन्नास वर्षे पूर्ण झाली. कोरोना महामारी च्या काळातही सामाजिक अंतर राखत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत, हा गुणवंतांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा सोहळा समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र राजवाडा येथे संपन्न झाला.
स्वर्गीय बन्याबापू उर्फ रा. ना. गोडबोले यांनी सामाजिक बांधिलकी मनात घेऊन गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे कार्य सुरू केले. आज हाच उपक्रम तब्बल पन्नास वर्षे अव्याहत आणि अखंडपणे गोडबोले कुटुंबीयांनी सुरू ठेवला आहे गोडबोले यांची चौथी पिढी सध्या या उपक्रमात कार्यरत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या वृत्तीने बन्याबापू गोडबोले यांनी हा ट्रस्ट सुरू केला. त्यास परिवारातील स्व. मालतीबाई गोडबोले यांनीही सदैव सहकार्य केले. बन्याबापू यांची तीन मुले अरुण, अशोक आणि डॉ.अच्युत यांनी या ट्रस्ट मध्ये स्वतःच्या मिळकतीतून भर घालत हा निधी वाढवला त्यानंतर या तिघांची पुढील पिढी या ट्रस्ट साठी सदैव झटत असून आता चौथ्या पिढीत नाही यामध्ये आपले योगदान देण्यास सुरू केले आहे .आजवर हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योगदान आत गोडबोले ट्रस्टने दिलेला मदतीचा हात हा अनेक हिरे आणि रत्नें निर्माण करणारा ठरला आहे.
मागील दोन वर्षे करोना च्या महामारी मुळे हा उपक्रम व शिष्यवृत्तीचे वितरण अगदी छोट्या स्वरूपात संपन्न होत आहे . समर्थ सदन येथे या वर्षीच्या या शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमात इयत्ता बालवाडी ते महाविद्यालयीन अशा एकूण 350 मुला-मुलींना पाचशे रुपयापासून पंधराशे रुपये पर्यंतची शैक्षणिक मदत प्रदान करण्यात आली. सुमारे 3 लाखाहून अधिक निधीचे वितरण ट्रस्टी यांचे हस्ते करण्यात आले. अशा तऱ्हेचा आपल्या उत्पन्नातील काही भाग देऊन गोडबोले कुटुंबीयांनी सुरू ठेवलेला उपक्रम वर्धिष्णू होत आहे, हे बहुधा एकमेव असे उदाहरण आहे.
या शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यास ट्रस्टचे विश्वस्त ज्येष्ठ कर सल्लागार व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले, सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष व जेष्ठ बालरोगतज्ञ डॉ.अच्युत गोडबोले, अशोक गोडबोले, उदयन गोडबोले, प्रद्युम्न गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसोबतच कौशिक प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली वाचनीय अशी पुस्तके भेट रूपात देण्यात आली. कार्यक्रमास माजी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, प्राध्यापक अविनाश लेवे, पत्रकार विजय मांडके, अतुल देशपांडे, गौतम भोसले, माधवराव गोडबोले यांची उपस्थिती होती .कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयडीबीआय ट्रस्टी कंपनीचे मानसी माचवे, मानसी पत्की ,सारंग फडणिस ,पूजा कुंणकेरकर, प्रवीण लवाटे, गोविंद खापरे ,प्रदीप चव्हाण, पंकज चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments