Breaking News

फलटण शहर व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांची उद्या बैठक

Meeting of Ganeshotsav Mandals of Phaltan city and taluka tomorrow

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - गणेशोत्सव  २०२१ च्या अनुषंगाने उद्या दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, फलटण येथे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या उपस्थिती मध्ये फलटण शहर व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व शांतता कमिटी सदस्य,पोलीस पाटील यांची संयुक्तिक बैठक बोलवण्यात आली असल्याचे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व ग्रामीण पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी कळविले आहे.

    आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गणेशोत्सव २०२१ शांततेत व सुरक्षितपणे पार पडावा यासाठी  मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहेत, तरी फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे  हद्दीतील सर्व  सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी तसेच शांतता कमिटी सदस्य, पोलीस पाटील यांनी  उद्या दि.३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, फलटण येथे उपस्थित राहावे असे आवाहन फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.

No comments