Breaking News

अतिरिक्त आयुक्त सौ. सुजाता ढोले यांना वूमन्स आचिव्हर्स अवॉर्ड 2021 प्रदान

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता दिलीप ढोले

Awarded Women Achievers Award 2021 to Additional Commissioner Mrs. Sujata Dhole

फलटण(प्रतिनिधी) - दैनिक नवराष्टतर्फे 'दैनिक नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड 2021 'आदर्श प्रशासकीय अधिकारी' म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता दिलीप ढोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

    सौ सुजाता दिलीप ढोले या मूळच्या फलटणच्या कन्या असून, त्या नवी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त तर त्यांचे पती दिलीपराव ढोले हे मीरा भाईंदर महानगरपालिकेत आयुक्त आहेत. त्यांना नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना राज्यपाल भवन येथे कोरोना योद्धा पुरस्कार तर विधानभवनात विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मुधोजी 1990 ग्रुपतर्फे स्नेह दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

    सुजाता ढोले यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत आपल्या कार्य कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविला असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दैनिक नवराष्टतर्फे आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून  दैनिक नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्ड 2021 'हा पुरस्कार ठाणे येथे राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल सौ. सुजाता ढोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments