Breaking News

वृत्तवाहिनीचा संपादक असल्याचे सांगणार्‍या तोतयास अटक ; 4 लाखांची फसवणुक

A liar who claims to be the editor of a news channel has been arrested in a fraud case of Rs 4 lakh

    बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. १७ ऑगस्ट - चार चाकी वाहन OLX (ओएलएक्स)  या वेबसाईटवर विक्री करता टाकून, त्यास गिऱ्हाईक आल्यानंतर, व्यवहार ठरवून ठरलेल्या व्यवहारातील 4 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी महेश मच्छिंद्र कदम रा. देसाईवस्ती बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे  व  प्रियांका पांडुरंग जाधव रा. एम. आ. डी. सी. बारामती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बारामती शहर पोलिसांनी महेश मच्छिंद्र कदम यास अटक केली आहे.  महेश मच्छिंद्र कदम हा मी, टाईम २४ न्युज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक आहे, असे सांगुन लोकांचा विश्वास संपादन करून, लोकांना विश्वसात घेवुन, त्यांची फसवणुक करीत होता. सदर आरोपीवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, तरी सदर आरोपीने कोणाची फसवणुक केली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येवुन तक्रार द्यावी असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

    बारामती शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार   महेश मच्छिंद्र कदम वय ३१वर्षे मुळ रा. काटी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद सध्या रा. देसाईवस्ती बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे याने व फरारी आरोपी  प्रियांका पांडुरंग जाधव रा. एम. आ. डी. सी. ता. बारामती जि. पुणे हीचे नावावर असलेली मारुती सुझुकी कंपनीची वॅगनार VXI 1.2 मॉडेलची कार तिचा नंबर MH-13-DL-7333 असा असलेली कार ही OLX या ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी फोटो व माहीती अपलोड केली,  वैभव सदाशिव लाटे (रा. भवानीपेठ, उमरज, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांना OLX वर विक्रीसाठी अपलोड केलेली कार आवडली व त्यांना  कार खरेदी करायची असल्याने, महेश मच्छिंद्र कदम याने, त्यांना बारामती येथे बोलवल्याने,  दिनांक १३/०८/२०२१ रोजी वैभव सदाशिव लाटे व त्यांचे भाऊ तसेच त्यांचे मित्र असे तिघेजण बारामती येथे आले असता, महेश कदम याने, त्याचेकडील नमुद कारमध्ये बसवुन गाडीची ट्रायल देवून व गाडीचे कागदपत्रे दाखवले, नंतर वैभव सदाशिव लाटे व आरोपी यांच्यामध्ये सदर गाडीचा ५ लाख रुपये रकमेला व्यवहार ठरला. त्यातील ४ लाख रुपये त्याच दिवशी व उरलेली १ लाख रुपये रक्कम ही गाडी खरेदीची सर्व प्रोसेस झालेनंतर देण्याचे ठरले, त्यांनतर यातील वैभव सदाशिव लाटे व साक्षीदार आणि महेश मच्छिंद्र कदम हे सर्वजण स्टेट बँक ऑफ इंडीया भिगवण रोड शाखा बारामती या ठिकाणी जावून, वैभव सदाशिव लाटे व त्यांचे भाऊ यांनी महेश मच्छिंद्र कदम याने सांगीतले प्रमाणे, प्रियांका पांडुरंग जाधव यांच्या अॅक्सीस बँक शाखा कन्ना चौक सोलापुर मधील खाते क्र. ९१६०१००६८१२३३६४ या खात्यावर फिर्यादीचे स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा उंब्रज शाखेतील खाते नंबर ३९४१८२०४४५६ मधील दि. १३/०८/२०२१ रोजी आर.टी. जी. एस. द्वारे  ४,००,०००/- रुपये ट्रान्सफर केले व त्यानंतर सदर महेश मच्छिंद्र कदम याने वैभव लाटे व साक्षीदार यांना त्याचेकडील नमुद वाहनात बसवुन घेवुन, बारामती येथील नविन प्रशासकिय भवन येथील माऊली झेरॉक्स सेंटर येथे जावुन, त्या ठिकाणी गाडीचे व्यवहाराची नोटरी करण्यास सुरवात केली. थोड्या वेळानंतर महेश मच्छिंद्र कदम याने वैभव सदाशिव लाटे व साक्षीदार यांना प्रियांका पांडुरंग जाधव हीस सही करण्यासाठी घेवुन येतो असे सांगुन, त्या ठिकाणाहून MH-13 DL-7333 ही गाडी घेवुन गेला. तो परत लवकर न आल्याने, वैभव सदाशिव लाटे व साक्षीदार यांनी त्यास त्याचे मोबाईल क्र. ९१३०२२७३३३ यावर अनेकवेळा फोन लावले, परंतु त्याने फोन उचलले नाहीत. त्यानंतर दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास वैभव सदाशिव लाटे व साक्षीदार यांनी अॅक्सिस बँक बारामती येथे जावुन, प्रियांका पांडुरंग जाधव हीचे खातेवर महेश मच्छिंद्र कदम याने सांगीतले प्रमाणे आर. टी. जी. एस. केलेल्या ४,००,०००/- रू रकमेबाबत चौकशी केली असता, सदर खात्यावरून सर्व रक्कम विड्रॉ केल्या बाबत सांगीतले, त्यानंतरही तक्रार देईपर्यंत वैभव सदाशिव लाटे व साक्षीदार आरोपीस फोन द्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आरोपी हा त्यांचा फोन रिसीव्ह करत नव्हता तेंव्हा वैभव सदाशिव लाटे व साक्षीदार यांची महेश मच्छिंद्र कदम व प्रियांका पांडुरंग जाधव यांनी संगणमत करून फसवणुक केली असल्याची फिर्याद वैभव सदाशिव लाटे यांनी दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर करीत आहेत.

    सदर आरोपी महेश मच्छिंद्र कदम वय ३१ वर्षे मुळ रा. काटी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद सध्या रा. देसाईवस्ती बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे हा लोकांना गाडी विकताना, मी टाईम २४ न्युज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा संपादक आहे, असे सांगुन लोकांचा विश्वास संपादन करून लोकांना विश्वसात घेवुन, त्यांची फसवणुक करीत आहे. सदर आरोपीवर डोंगरे पोलीस स्टेशन मुंबई १) गु.र.नं. ०३/२०१४ भा.द.वि.क.३६५,३६८,३४४,३४६,३२४,३२५,५०६, ३४ जेल रोड पोलीस स्टेशन सोलापुर २) गु.र.नं. ३३१/२०१८ भा. द.वि.क.(बी) (सी), ३४ सोलापुर तालुका पोलीस स्टेशन ३) गु.र.नं. ०२/२०२१ भा.द.वि.क. १४३,१४७,१४८,१४९,५०४, ५०६, ३८०, ३२७ व चेक बॉन्सचे दोन गुन्हे दाखल असुन आरोपीने अश्या प्रकारे कोणाची फसवणुक केलेली असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येवुन तकार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक गणेश हनुमंत निंबाळकर, सहा. फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक बापु बनकर, पो.कॉ. दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, सायबर क्राईमचे सुनिल कोळी, चैतन पाटील यांनी केली.

No comments